बीडमध्ये भाजपच्या किरीट सोमय्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; मुस्लीम नागरिकांनी दाखवले काळे झेंडे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- “विरोधी पक्षातील नेत्यांचे वेगवेगळे घोटाळे बाहेर काढत त्यांच्यावर आरोप करणारे भाजप नेत किरीट सोमय्या संध्या बांगलादेशी नागरिकांच्या भारतातील निवासाबद्दल सक्रीय झाले आहेत.
भाजप नेते किरीट सोमैय्या त्याच अनुषंगाने आज बीड जिल्हा दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांच्या ताफ्याला मुस्लिम नागरिकांनी काळे झेंडे दाखवले आहेत.
भाजपा नेते किरीट सोमय्या हे परळी शहरात आले होते. तब्बल दोन तास त्यांनी पोलीस ठाण्यात बांगलादेशी नागरिकांना बोगस जन्म दाखला देणाऱ्या संबंधित सर्वावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
परळीतून ते परत जात असताना मुस्लिम समाजाने थेट सोमैय्या यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
परळी शहरातील मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक व एक मिनार चौकात घोषणाबाजी करत काही मुस्लिम नागरिकांनी हातात काळे झेंडे दाखवत ही घोषणाबाजी केलीय.
दरम्यान पोलीस प्रशासनाने ही परिस्थिती हाताळत त्यांचा ताफा सहीसलामत या मार्गावरुन काढून दिला.
किरीट सोमय्यांच्या ताफ्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो, तरीही नागरिकांना आपल्या संतप्त भावना व्यक्त करत सोमय्या यांच्या ताफ्यासमोर काळ झेंडे फडकावले

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..