भाजप 2034 मध्ये देशात नवं संविधान आणणार, काँग्रेसचा खळबळजनक दावा….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “देशात नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरु असून, 2034 साली नवीन संविधान लागू करण्यासाठी बैठका सुरु असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना व्यक्तिशः पक्ष संदर्भात आणि विचारधारेशी संबंधित भारताचं संविधान मान्य नसल्याचे सपकाळ म्हणाले. त्यामुळं संघ आणि भाजपच्या बगलबच्चांनी नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरु केल्याचे सपकाळ म्हणाले.
पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात मंगेशकर कुटुंबियांनी महाराष्ट्राची माफी मागावी
2034 झाली देशात नवीन संविधान लागू करण्यासाठी बैठकाही सुरु झाल्या असल्याचा दावा आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर चौफेर टीकाही केली आहे. पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात मंगेशकर कुटुंबियांनी महाराष्ट्राची माफी मागावी असंही त्यांनी म्हटलं आहे.
11 वर्षात पंतप्रधान मोदींनी काहीच केलं नाही
गेल्या 11 वर्षात पंतप्रधान राहूनही मोदींनी सांगण्यासारखं काहीचं केलं नसल्याने काल त्यांनी आंबेडकरांचा मुद्दा उपस्थित केल्याचे सपकाळ म्हणाले. भ्रम पसरवणे, काँग्रेसला बदनाम करणं एवढेच मोदींनी सुरु केलं आहे. पंतप्रधानांचा असं वर्तन हे अशोभनीय असल्याचे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. पंडित जवाहरलाल नेहरुंनी त्यांच्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना थेट सन्मानाचे कायदामंत्रीपद दिलं होतं हे मोदींनी विसरु नये असंही सपकाळ म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान आहेत हे भाजप आणि संघाला मान्य नाही
नाशिकच्या काळाराम मंदिरात डॉ. बाबासाहेबांना दर्शन घेऊ दिलं नाही हे दुर्दैव आहे. दलित ओबीसी आणि काँग्रेसमध्ये मोदी दरी निर्माण करु बघत आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांना मोदी फॅसिस्ट करत आहेत. आरएसएस जनसंघ व आजच्या भाजपच्या लोकांनी बाबासाहेबांना नेहमीच असन्मानित केलं आहे. मनुस्मृतिद्वारे संविधान लिहिलं जावं व मनुस्मृतिद्वारे संविधान चालावं असं गोळवलकर गुरुजींनी लिहिलेलं “बंच ऑफ थॉट” हे भाजपच ” बायबल ” आहे असा टोलाही सपकाळ यांनी भाजपला लगावला. भाजपला आणि संघाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान आहेत हे मान्यच नाही. भाजपाला जर इतकं वाटत असेल तर त्यांनी गोळवलकर गुरुजींनी लिहिलेलं बंच ऑफ थॉटची होळी करावी असेही सपकाळ म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः कधीही काँग्रेसमुळं माझा पराभव झाला असं म्हटलं नाही. उलट त्यांनी त्यांच्या पराभवाच्या कारण डांगे व विनायक दामोदर सावरकर यांच्यावर फोडल्याचे सपकाळ म्हणाले.
भाजपला जर संविधान बदलवायचं आहे तर त्यांनी थेट भूमिका घ्यावी
मोदींना व्यक्तिशः, पक्ष संदर्भात आणि विचारधाराशी संबंधी भारताच संविधान मान्य नाही. संविधान लिहिताना ते मनुस्मृती संबंधित लिहिल्या गेलं पाहिजे असं संघाने आणि जनसंघाने सांगितलं होतं याचे पुरावे उपलब्ध आहेत. ते समतेच्या विरोधात होते. सध्या देशात नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया संघ आणि भाजपच्या बगलबच्चांनी सुरु केली आहे. 2034 साली आम्ही नवीन संविधान लागू करू यासाठी त्यांच्या बैठकाही सुरू आहेत. असे सपकाळ म्हणाले. 2024 च्या निवडणुकीत आपकी बार 400 पार हे जे सुरु होतं तर भाजपचेच उमेदवार सांगत होते की आम्हाला संविधान बदलायचा आहे आणि अजूनही ते त्यावर ठाम आहेत. भाजपला जर संविधान बदलवायचं आहे तर त्यांनी थेट भूमिका घ्यावी “मुह मे राम बगल मे छुरी..” असं करु नये असेही सपकाळ म्हणाले.
फडणवीस सरकार हे औरंगजेबच्या क्रूरते प्रमाणेच काम करतंय
औरंगजेब ज्याप्रमाणे धर्माचा वापर सरकार चालवण्यासाठी करत होता त्याचप्रमाणे आजच फडणवीस सरकार हे औरंगजेबच्या क्रूरते प्रमाणेच काम करत आहे. संविधानापेक्षा इंग्रज परवडले, आम्हाला स्वातंत्र्य नको अशी भूमिका घेणारे महाराष्ट्रात त्याकाळी काही लोक होते ( सावरकर यांचं नाव न घेता यांच्याकडे दिशानिर्देश ) यांचं व्यक्तींनी इंग्रजांना मदत केली. त्यांचं पेन्शन घेतलं माफीनामाही लिहून दिला. अशा प्रवृत्तींचे पुतळे हे काढून टाकणार का? असा सवाल ज्यावेळेस मी केला त्यावेळेस त्यांनी औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावर माघार घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व नाकारणारे व इतिहास समोर येऊ नये यासाठी “फुले” चित्रपट रिलीज कसा होऊ देणार..? असा सवालही सपकाळ यांनी केला. जर अमित शाह औरंगजेबच्या कबरीला समाधी म्हणत असतील तर गोळवलकर गुरुजींच्या व हेडगेवार गुरुजींच्या स्मृतीस्थळाला कबर म्हणायचं का..? हा माझा अमित शाहा यांना प्रश्न असल्याचे सपकाळ म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..