राज्यावर अवकाळीचे संकट कायम, मराठवाडा- मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस; येलो अलर्ट जारी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
हातातोंडाशी आलेले पिक निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडणार आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरीत राज्यात ढगाळ हवामानासह उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसंच जळगाव, अहिल्यानगर, सांगली, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड या सर्व जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, शनिवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा ४२ अंशापार गेला होता. अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, मालेगाव आणि धुळे येथे ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तर परभणी, अमरावती आणि नागपूर येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. तसेच जळगाव, जेऊर, निफाड, सोलापूर, गडचिरोली, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..