छत्रपती शिवाजी महाराज ‘भाजप’मध्ये नव्हते म्हणून…; अमित शहांवर निशाणा साधत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुख्यमंत्र्यांनी खास छावा चित्रपटाचे प्रदर्शन केले आणि त्यातून लोक भडकले आहेत. औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला. गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला. त्याचा हा परिणाम आहे का? गुजरातच्या या नेत्यांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का एवढं?
औरंगजेबाच्या कबरीला प्रत्यक्ष समाधीचा दर्जा देण्याचा देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडातून आला. त्यावेळी छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते. त्यांना खरं म्हणजे त्रास झाला पाहिजे होता, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
देशाचे गृहमंत्री अमित शाह रायगड किल्ल्यावर आले होते जिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आणि नंतर जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी औरंगजेब वादावरही भाष्य केले. अमित शाह म्हणाले की, औरंगजेब स्वतःला आलमगीर म्हणवत असे, पण महाराष्ट्रात त्याचा पराभव झाला आणि त्याची कबर येथे बांधण्यात आली. शिवराय फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहू नये. त्यांचा वारसा संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणास्रोत आहे. यावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, औरंगजेबाची समाधी हा शब्द इतर कोणाच्या तोंडून निघाला असता तर या दोघांनी अक्षरश थयथयाट केला असता. यात अजित पवार संयमी आहेत. औरंगजेबाच्या कबरीबद्दल समाधीचा शब्द गृहमंत्र्यांच्या तोंडातून निघाला. यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या तोंडातून काही शब्द निघाला नाही, असं ते म्हणाले आहेत.
ते म्हणाले की, उदयनराजे भोसले हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. म्हणून त्यांना बोलवायचं. छत्रपती शिवाजी महाराज हे भाजपमध्ये नव्हते. म्हणून तुम्ही या छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रित केलेलं नाही. तुम्ही कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजांना आमंत्रित केले नाही. तुम्ही जे भाजपचे हाजीअजी करत आहेत, त्यांना निमंत्रण दिलं आहे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण पाहून छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असेल.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..