महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा ; मल्लिकार्जून खर्गे यांचा गंभीर आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून सत्ताधारी भाजपवर मोठा आरोप केला आहे. नुकतीच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडली.
या निवडणुकीत कधी नव्हे तर सत्ताधारी पक्षाला २८८ जागांपैकी २०० पेक्षा अधिक जागा मिळाल्यात. याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये अचानक ५५ लाख मतदार कसे वाढले ? असा सवाल मल्लिकार्जून खर्गे यांनी केला आहे.
यावेळी बोलताना ‘खर्गे’ यांनी भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीतील कथित विजयावरही प्रश्नचिन्ह उभे केले. ते म्हणाले, “मी आजपर्यंत कुठेही पाहिले नाही किंवा ऐकले नाही की भाजप 150 जागा लढवते आणि त्यापैकी 138 जागा जिंकते. 90 टक्के निकाल? या देशात असा निकाल कधी पाहिला आहे का? आम्ही अनेक निवडणुका पाहिल्या आहेत, मी स्वतः 12-13 निवडणुका लढलो आहे, पण असे कधीच झाले नाही.” खर्गे यांनी असा आरोप केला की महाराष्ट्रातील हा कथित घोटाळा लोकशाहीला नष्ट करण्यासाठी आणि विरोधकांना हरवण्यासाठी करण्यात आला आहे आणि याविरोधात लढणे आवश्यक आहे.
खर्गे यांनी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) च्या वापरावरूनही सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “तुम्ही अशीTechnique बनवली आहे, ज्याने तुम्हाला फायदा होईल आणि विरोधकांना नुकसान होईल. जर तुम्ही अशी टेक्नोलॉजी वापरून आमचा पराभव करत असाल, तर आज किंवा उद्या या देशातील तरुण नक्कीच याविरोधात लढतील आणि बॅलेट पेपरची मागणी करतील, ईव्हीएम नको म्हणतील.” त्यांनी पुढे असेही म्हटले की, संपूर्ण जग ईव्हीएम सोडून बॅलेट पेपरकडे वळत आहे, पण आपल्या देशात ईव्हीएमचा वापर सुरू आहे. ही फसवणूक असून ईव्हीएमचा वापर बंद करून भारतात बॅलेट पेपरने निवडणुका व्हायला पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
यासोबतच मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही गंभीर टीका केली. ते म्हणाले, “देश सध्या एकाधिकारशाहीकडे वाटचाल करत आहे. सर्वसामान्य नागरिकांची संपत्ती हे सरकार आपल्या श्रीमंत मित्रांकडे हस्तांतरित करत आहे. ज्या प्रकारे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम त्यांच्या मित्रांना विकले जात आहेत, ते पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी एके दिवशी आपला देश विकून टाकतील, तो दिवस दूर नाही. सरकारची संपत्ती त्यांच्या श्रीमंत मित्रांच्या हातात दिली जात आहे,” असा आरोपही खर्गे यांनी केला.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….