दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 56 नवीन पॉझेटीव्ह ; 80 जणांची कोरोनावर मात
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 4 :
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युमध्ये दोन जणांची भर पडल्याने आतापर्यंत एकूण मृत्युची संख्या 34 झाली आहे. तर जिल्ह्यात आज (दि. 4) 56 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 80 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मंगळवारी मृत झालेल्या दोन जणांमध्ये यवतमाळ शहरातील पाटीपुरा येथील 65 वर्षीय महिला आणि दिग्रस तालुक्यातील फुलवाडी येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये पुसद शहरातील महावीर वॉर्ड येथील एक पुरुष, पुसद शहरातील तीन पुरुष व पुसद ग्रामीण मधील एक पुरूष, दिग्रस शहरातील श्रीरामपूर येथील एक पुरूष, दिग्रस शहरातील पाच महिला व 13 पुरुष, पांढरकवडा शहरातील एक पुरूष व एक महिला, यवतमाळ शहरातील आंबेडकर चौक येथील एक पुरुष, काळे लेआऊट येथील एक पुरूष, कमला पार्क येथील एक पुरूष व एक महिला, संभाजीनगर येथील एक महिला, दर्डा नगर येथील एक पुरूष, उमरखेड शहरातील चार पुरुष व 13 महिला, आर्णी शहरातील तीन पुरुष व दोन महिला, नेर शहरातील एक पुरुष व एक महिला पॉझेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात सोमवारपर्यंत 464 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण होते. यात आज नव्याने 58 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे हा आकडा 522 वर पोहचला. मात्र दोन जणांचा मृत्यु आणि ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 80 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 440 झाली आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 1284 झाली आहे. यापैकी 810 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 34 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 130 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मंगळवारी 368 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 20781 नमुने पाठविले असून यापैकी 16542 प्राप्त तर 4239 अप्राप्त आहेत. तसेच 15258 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
०००००००

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..