विदर्भ राज्य निर्मितीचा अधिवेशनात ठराव; पंतप्रधानांकडे पाठविणार पत्र, १ मे रोजी निषेधदिन पाळणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “विदर्भ राज्य निर्मितीची १२० वर्षांपासूनची मागणी कायमची निकाली काढावी. ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी. विदर्भ राज्य निर्मितीचा ठराव अधिवेशनात सर्व प्रतिनिधींच्या संमतीने पारित करण्यात आला.
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना या ठरावाबाबत पत्र पाठविण्यात येणार असल्याचे अधिवेशनात जाहीर करण्यात आले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तिसरे अधिवेशन आमदार निवास येथे आयोजित करण्यात आले होते. दोन दिवसीय अधिवेशनाचा सोमवारी समारोप झाला. समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, विदर्भवादी नेते व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, महिला आघाडीच्या अध्यक्ष रंजना मामर्डे, अहमद कादर, नरेश निमजे, डॉ. पी.आर. राजपूत उपस्थित होते.
अधिवेशनात १ मे रोजी महाराष्ट्र दिनाला निषेध पाळण्याचा निर्धार करण्यात आला. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काळी पट्टी, काळा शर्ट, काळी पॅन्ट घालून हा निषेध नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. अमरावती येथे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम विदर्भाचा मेळावा ‘निर्धार मेळावा’ आयोजित करण्याचे ॲड. वामनराव चटप यांनी जाहीर केले.
विदर्भ राज्याची निर्मिती होणे आता दूर नाही, असा आशावाद अधिवेशनात व्यक्त करण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी विदर्भ राज्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणा करून युवकांचा अधिक सहभाग वाढविण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….