एकनाथ शिंदेंविरोधात बोलण्यासाठी सुपारी मिळाली? कुणाल कामरा म्हणाला, “माझं बँक अकाऊंट…”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) नुकत्याच झालेल्या स्टँडअप शोमध्ये उमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विडंबन करणारं गीत सादर केलं. ‘भोली सी सूरत’ या लोकप्रिय गाण्याच्या चालीवर त्याने एकनाथ शिंदेंवर टिप्पणी केली.
यानंतर शिंदे समर्थकांनी तो स्टुडिओच फोडला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कामरावर टीका करत असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. कुणाल कामरला शिंदेंविरोधात बोलण्यासाठी सुपारी मिळाली होती का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो काय म्हणाला वाचा.
कॉमेडियन कुणाल कामरावर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं. तुला सुपारी मिळालेली का? या प्रश्नावर तो म्हणाला, “मी का सुपारी घेऊ? तुम्ही माझं बँक अकाऊंट तपासू शकता. मी मराठीत नाही तर हिंदीत शो केला आहे. मी कोणाकडूनही सुपारी घेतलेली नाही आणि मला कोणी पैसे दिलेही नाहीत.”
माफी न मागण्यावर ठाम
कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माफी मागावी अशी मागणी समर्थक करत आहे. मात्र कुणाल माफी न मागण्यावर ठाम आहे. तो पोलिसांना म्हणाला, “मी पूर्णत: शुद्धीत जागसूदपणे हे विधान केलं आहे. मला कोणताच पश्चाताप नाही आणि ना खेद आहे. अशाच प्रकारचं वक्तव्य अजित पवारांनीही शिंदेंवर केलं होतं. त्यामुळे मी तरी का माफी मागू? न्यायालयाने सांगितलं तरच मी माफी मागेल. पोलिस आणि न्यायालयाला सहकार्य करण्याची माझी तयारी आहे. “

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….