“प्रशांत कोरटकर तेलंगणात काँग्रेस नेत्याच्या घरी लपलेला”, भाजपा आमदाराचा दावा; वडेट्टीवार म्हणाले, “भाजपाचं पाप.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर हा तेलंगणात लपून बसला होता.
पोलिसांनी सोमवारी (२४ मार्च) त्याला अटक केली असून आज त्याला कोल्हापूर न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तत्पूर्वी भाजपा आमदार परिणय फुके यांनी दावा केला आहे की “प्रशांत कोरटकर हा तेलंगणात एका काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसला होता. तसेच त्याला तिकडे जाण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी मदत केली होती.”
परिणय फुके म्हणाले, “प्रशांत कोरटकर याचं संरक्षण काढल्यानंतर चार-पाच दिवसांत त्याला अटक करण्यात आली आहे. तो तेलंगणात काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसला होता. त्यामुळे असं वाटतंय की काँग्रेस त्याला वाचवू पाहतेय. मात्र मी सर्वांना खात्री देतो की आमचं सरकार त्याला कडक शिक्षा करेल.”
आमदार परिणय फुके काय म्हणाले?
परिणय फुके म्हणाले, “प्रशांत कोरटकर हा तेलंगणात काँग्रेस नेत्याच्या घरात सापडला. त्याला काँग्रेसच्या नेत्याने आश्रय दिला होता. माझा आरोप आहे की महाराष्ट्रातील काँग्रेस नेते यात सामील आहेत. इथल्या काही नेत्यांनी सांगितलं की कोरटकरला कोणत्या मार्गाने तेलंगणात नेलं. गडचिरोलीमार्गे त्याला कशा पद्धतीने तेंलगणात नेलं ही माहिती ज्या लोकांनी दिली तेच लोक यात सहभागी आहेत. हे सगळं महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्यासाठी केलं जात आहे. हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पक्षाने कोरटकरला एक महिन्यापासून संरक्षण दिलं होतं. महायुतीच्या सरकारला बदनाम करण्याचा त्यांचा कट होता.
आमदार फुके म्हणाले, “कोरटकर हा काँग्रेसशासित राज्यात एका काँग्रेस नेत्याच्या घरात सापडला आहे. यात कोणाचा हात होता हे चौकशित पुढे येईल. त्याचे कॉल रेकॉर्डिंग तपासून आणखी काही सत्य बाहेर येतील. त्यातून महाराष्ट्र काँग्रेसचे नेते समोर येतील.”

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….