राज्यातील उष्णतेची लाट तीव्र; चंद्रपूर 42, पुणे 40 अंशांवर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यातील उष्णतेची लाट आणखी तीव्र झाल्याने काही भागात अत्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. शनिवारी काही भागांत ढगाळ वातावरण तयार झाले होते. दरम्यान, चंद्रपूरचे तापमान 42, तर पुणे शहराचे 40 अंश सेल्सिअसवर गेले होते.
गेले दोन महिने राज्यातील उष्ण तापमान वाढतच आहे.
होळीनंतर मात्र राज्याच्या तापमानात दीड ते दोन अंशांनी वाढ झाल्याने उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती तयार झाली असून, राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे काही भागांत अत्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे. मात्र त्याचा सुधारित अंदाज येण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागेल.
शनिवारचे कमाल तापमान
मुंबई 33.3, पुणे (लोहगाव) 40.3, चंद्रपूर 42, अकोला 41.3, वर्धा 41, जळगाव 38.5, कोल्हापूर 37.1, महाबळेश्वर 32.5, मालेगाव 40, नाशिक 36.9, सातारा 37.7, सोलापूर 40.3, धाराशिव 38, परभणी 39, ब्रह्मपुरी 40.8, गोंदिया 38.8, नागपूर 40.2, वाशिम 39.8, यवतमाळ 39.8.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….