‘मटणवाले बाल हिंदुहृदयसम्राट’ ; शिवसेना ठाकरे गटाची नितेश राणेंवर खोचक टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात मटण विक्री करणाऱ्या हिंदू दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार आक्षेप घेतला आहे.
खासदार संजय राऊत यांनी आजच्या रोखठोकमध्ये राणे यांच्यावर खोचक टीका करताना त्यांना ‘मटणवाले बाल हिंदुहृदयसम्राट’ असे संबोधले आहे.
संजय राऊत यांनी आपल्या टिकेत भाजपवरही हल्ला चढवला. “उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ मुस्लीम गुंड व माफियांचे एन्काऊंटर करत आहेत. पण त्यांच्या जातीचे गुंड आणि माफियांना अभय दिले जात आहे. याचा अर्थ भाजपशासित राज्यांमध्ये हिंदू माफियांना हिंदूंना लुटण्याचा पूर्ण अधिकार आहे,” असे विधान रोखठोकमध्ये करण्यात आले आहे.
मटण विक्रीसाठी हिंदू दुकानदारांसाठी नवे नियम?
मटण विक्रीसाठी हिंदू दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्णय हा हिंदुत्वाच्या नावाखाली दुहेरी राजकारण असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. शिवसेना (ठाकरे) गटाने भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, “मुंबईतील मंगलप्रभात लोढांसारखे अनेक बिल्डर मटण खाणाऱ्या हिंदूंना त्यांच्या गृहसंकुलात पाय ठेवू देत नाहीत. अशा वेळी हे ‘मटणवाले बाल हिंदुहृदयसम्राट’ गप्प का?”
शिवसेना ठाकरे गटाने यापूर्वीही भाजप सरकारवर समाजात फूट पाडण्याचा आरोप केला आहे. त्यांनी असा सवाल केला की, जेव्हा स्वातंत्र्यलढ्यात मुसलमान क्रांतिकारकांनी बलिदान दिले, तेव्हा ते भारतीय होते, मग आता त्यांच्याबाबत वेगळा दृष्टिकोन का?
शिवरायांचा इतिहास
संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख करत भाजप सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, “शिवरायांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी सुफी संत शाह शरीफ यांच्या सन्मानासाठी आपल्या मुलांची नावे शहाजी आणि शरीफजी ठेवली होती. तसेच शिवरायांनी त्यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिकांचा मोठा वाटा ठेवला होता.”
त्यांनी पुढे नमूद केले की, “शिवरायांच्या नौदलाचे नेतृत्व सिद्दी संबलच्या हाती होते, आणि त्यांच्या गुप्तहेर विभागाचा सचिव हैदर अली होता. त्यांचा शस्त्रागार प्रमुख इब्राहिम खान होता. मग आज काही लोक शिवरायांना धर्मांध चौकटीत का बसवत आहेत?”
महाराष्ट्रात ‘हिंदू पाकिस्तान’ निर्माण होत आहे का?
शिवसेना (ठाकरे) गटाने फडणवीस सरकारवरही टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचा खरा इतिहास जपायचा असेल, तर अशा वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर टाकावे.
“काही लोकांना औरंगजेबाची कबर उखडायची आहे, पण महाराष्ट्रात हिंदू पाकिस्तानवादी हिंदू औरंगजेब तयार करत आहेत. हे कबरीतल्या औरंगजेबापेक्षा भयंकर आहेत,” अशी घणाघाती टीका रोखठोकमध्ये करण्यात आली आहे.
भाजपने भूमिका स्पष्ट करावी – शिवसेना ठाकरे गट
शिवसेना (ठाकरे) गटाने भाजपला आव्हान दिले आहे की, त्यांनी मटण विक्रीबाबतच्या निर्णयावर स्पष्ट भूमिका घ्यावी. सरकारचा हेतू हिंदू-मुस्लिम दुभंग करण्याचा नाही ना, याची जाहीरपणे कबुली द्यावी, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….