विधानपरिषद निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून ‘या’ नावांची चर्चा, कुणाला मिळणार संधी?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.
महायुतीत भाजपने तीन उमदेवारांची नावं जाहीर केली आहेत. तर एकनाथ शिंदे गट आज त्यांच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून कुणाला संधी मिळेल, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव चर्चेत आहे. याशिवाय संजय मोरे आणि किरण पांडव यांची नावं देखील आघाडीवर आहेत.
संजय मोरे हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तर किरण पांडव हे पक्षाचे विदर्भातील महत्त्वाचे नेते आहेत. या निवडणुकीसाठी पक्षातील इच्छुकांची संख्या बघता नाराजी नाट्य टाळण्यासाठी एकनाथ शिंदे सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत. अशातच विधानपरिषदेसाठी शिंदे गटाकडून कुणाला संधी मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महायुतीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. याशिवाय आज शिंदे गट आणि अजित पवार गटही त्यांचे उमेदार जाहीर करण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेच्या पाच आमदारांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. यात त्याचा विजय झाला होता. त्यामुळे त्यांच्या जागा आता रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडीच्या संख्याबळ बघता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….