जयंतरावांच्या ‘त्या’ विधानाचे सर्वपक्षीय पडसाद; भाजप प्रवेशावरून उडाला राजकीय धुरळा, असं काय म्हणाले पाटील?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शिवसेनेचे संजय शिरसाट म्हणाले, ”जयंतराव फार काळ पवार यांच्यासोबत राहणार नाहीत. ते अजितदादांच्या राष्ट्रवादीत दिसतील.”
मुंबईत आझाद मैदानात झालेल्या शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनात केलेल्या एका विधानावरून आमदार जयंत पाटील गेले दोन दिवस राज्यातील राजकारणाच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत.
त्यांच्या भाषणातील ‘माझी काही गॅरंटी घेऊ नका, माझी काही गॅरंटी नाही,’ या विधानाला त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेशी जोडले गेल्याने राजकीय धुरळा उडाला. सर्वपक्षीय नेत्यांनी त्यावर आपापली मते व्यक्त केली. जयंतरावांनाही मग त्यावर खुलासा करावा लागला.
जयंत पाटील म्हणाले होते, ”आपल्या छातीवरून महामार्ग जात असताना आपण नाही त्या विषयात अडकून पडतो. हिंदुत्वाचं काय होणार, यावर चर्चा करत बसतो. मूळ मुद्दा शेतकऱ्यांवर अन्यायाचा आहे. राजू शेट्टी यांनी एखादा झेंडा हाती घेतला की ते खाली ठेवत नाहीत. माझी गॅरंटी घेऊ नका, माझी काही गॅरंटी नाही. माझ्याबद्दल मनात शंका असल्यानं हमी देणंही धोक्याचं आहे. त्यांना मी शंभर वेळा सांगत होतो, आघाडीकडून उभा राहा. बंटी पाटलांना विचारा. निरोप देऊन दमलो. सांगायचा मुद्दा हाच की, ते खासदार झाले असते, संसदेत हा मुद्दा मांडला असता. मात्र ते माझा सल्लाच ऐकत नाहीत.”
अनेक माध्यमांनी जयंत पाटील यांच्या भाषणातील ‘तो’ तुकडा तोडला आणि त्यावर जयंतरावांच्या मनात काय सुरू आहे, यावर खलबतं सुरू झाली. गेल्या दोन दिवसांपासून या बातम्या चर्चेत आहेत. त्यावर सर्वपक्षीय नेत्यांनीही आपले मते मांडली.
शिवसेनेचे संजय शिरसाट म्हणाले, ”जयंतराव फार काळ पवार यांच्यासोबत राहणार नाहीत. ते अजितदादांच्या राष्ट्रवादीत दिसतील.” विजय वडेट्टीवार म्हणाले, ”जयंतरावांची नाराजी भाषणातून दिसते. ते फार सीनिअर आहेत. अनेक पदावर कामे केली आहेत. त्यांच्या द्दलच्या या वावड्या असाव्यात.”
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ”महायुतीच्या यशानंतर जयंत पाटील नाराज आहेतच. नागपुरात ‘माझं मन कशात लागत नाही’, असं सांगितलं होतं. सत्तेत नसताना पाच वर्षे सारं टिकवणं अवघड असतं, याची कल्पना आली असावी.” खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”जयंत पाटील यांना सकाळीच भेटले. दौऱ्याचे नियोजन केले. गंमत आहे, विरोधकांची एवढी मोठी संघटना असली तरी त्यांना जयंतराव हवेहवेसे वाटतात.”
जयंतरावांना काय म्हणायचे?
शक्तिपीठ महामार्ग आंदोलनावेळी केलेल्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचे सांगत आमदार जयंत पाटील यांनी गेल्या दोन दिवसांत विविध ठिकाणी माध्यमांसमोर खुलासे केले आहेत. ते म्हणाले,”शक्तिपीठ आंदोलनावेळी ते विधान मी राजू शेट्टी यांच्याबद्दल बोललो होतो. ते आमच्याबरोबर राहिले असते, माझं ऐकलं असतं तर खासदार म्हणून लोकसभेत गेले असते. तिथे हा प्रश्न मांडला असता, मात्र कदाचित त्यांचा आमच्यावर विश्वास नसेल. त्याअर्थाने मी पुढचे विधान म्हणालो, ‘माझ्यावर विश्वास ठेवू नका.’ त्या वाक्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढण्याचे कारण नव्हते. मला मुद्दाम तिकडे ढकलायचे आहे की काय, असे वाटते.”

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….