दिल्लीत मराठा योद्ध्यांचे पुतळे उभारावेत; ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ”मराठा साम्राज्याचे योद्धे पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्या ऐतिहासिक छावणीचा परिसर राहिलेल्या तालकटोरा स्डेडियममध्ये या योद्ध्यांचे अश्वारूढ पुतळे उभारण्यात यावे,” अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.
यासाठीचे पत्रही त्यांनी पंतप्रधानांना पाठविले आहे.
दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले होते तर शरद पवार हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते.
त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी साहित्य संमेलनाचा संदर्भ देत मराठा योद्ध्यांचे पुतळे उभारण्याची मागणी केली आहे. ”भारतातील गौरवशाली इतिहासाचे संवर्धन आणि सन्मान करण्याच्या दृष्टीने आपले नेतृत्व नेहमीच महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे या मागणीची दखल घेऊन आवश्यक तो निर्णय होईल,” अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
‘आपुलकी भावली’
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानताना शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे, की सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने आयोजित केलेले साहित्य संमेलन ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरले. आपल्या सखोल आणि चिकित्सक भाषणाने जगभरातील मराठी लोकांच्या मनाला स्पर्श केला. उद्घाटन समारंभादरम्यान आपण माझ्याविषयी दाखवलेली आपुलकी भावणारी होती.
योग्य सन्मान मिळावा
शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे की, तालकटोरा स्डेडियमच्या जागेवर पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांनी छावणी उभारली होती. त्यांच्या पराक्रमाने आणि योगदानाने भारतीय इतिहासात अजरामर स्थान मिळवले आहे.
हीच आठवण जपण्यासाठी ‘सरहद’तर्फे या वीरांचे अर्धपुतळे उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, अनेकांचे असे मत आहे की, या महान योद्ध्यांना अधिक योग्य सन्मान मिळावा म्हणून तिथे पूर्णाकृती अश्वारूढ पुतळे उभारले जावेत. तालकटोरा स्टेडियम हे नवी दिल्ली महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने, या ठिकाणी पूर्णाकृती अश्वारूढ पुतळे उभारण्याची आवश्यक परवानगी देण्यासाठी आपण दिल्ली सरकार आणि महानगरपालिकेला सूचना द्याव्यात.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….