म्हणून शिवसेनेत प्रवेश केला, रवींद्र धंगेकरांनी अखेर सोडला काँग्रेसला “हात”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- “महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर जोरदार इन्कमिंग सुरू आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाच्या गळाला मोठा मासा लागला आहे. पुण्यात कसबा पोटनिवडणूक गाजवणारे काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र केला आहे.
धंगेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे शेकडो कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल झाले आहे.
काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पुण्यात एका छोटेखानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, धंगेकरांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवशी त्यांची घरवापसी झाली आहे. यावेळी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. धंगेकरांचा शिवसेनेत प्रवेश हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी काँग्रेस सोडण्याचं कारणही धंगेकरांनी सांगितलं.
…म्हणून काँग्रेसची साथ सोडली
‘मी दहा वर्ष शिवसेनेचा नगरसेवक आणि विभाग प्रमुख होतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे काही उपक्रम राबवले आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना सर्वांना मिळून न्याय द्यायचं काम केलेलं आहे. आपण सर्वांनी पाहिला आहे. परत कुटुंबात आणण्यासाठी शिंदे साहेब यांनी प्रयत्न केले हे मी दोन महिन्यांपासून पाहतोय. पुण्यातले सर्वच नागरिक आम्ही तुमचे आभार मानतो. आम्हाला पक्षप्रवेश दिला आणि मोठे भाऊ म्हणून आम्हाला सामावून घेतलं. याच्यापुढे जो काही आदेश तुम्ही द्याल शिवसेनेचा नाव कमी होता कामा नये असं काम आम्ही करू. शिवसेनेचा उंचावण्याचं काम सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये करण्याचं काम आम्ही करू, असं यावेळी धंगेकर म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे
– , काँग्रेसचा मी म्हणणार नाही कारण ते आधी शिवसेनेत होते
– मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी आज भगवा हातात धरलेला आहे
– रवींद्र धंगेकर पुण्यामध्ये लोकप्रिय आणि लोकनेता म्हणून ओळखतात कामाने त्यांची ओळख निर्माण केलेली आहे.
– मी पोटनिवडणुकीमध्ये तिकडे होतो सर्व फौज लागली तरी धगेकरांनी खऱ्या अर्थाने तेव्हा मी ऐकलं मी कार्यकर्त्याच्या रूपाने कसं काम करायचं
– नगरसेवक पंचवीस वर्षे होते त्यातले दहा वर्षे हे शिवसेनेचे नगरसेवक होते
– ती पोटनिवडणूक गाजली
– एवढं सर्व करून पण रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली
– शिवसेनेमध्ये आलेला आहे
– आता लोकांना कळेल हु इज धंगेकर
– तेव्हा कसं काँग्रेसमध्ये होते मालक कोणी नाही आता ते माझ्यासोबत आहेत आणि माझ्या सकट
– मला लोकांनी हलक्यात घेतलं
– 2022 चा इतिहास घडला
– सर्व देशांनी त्याची दखल घेतली आणि हु इज एकनाथ शिंदे
– आता तुम्ही विरोधी पक्षात नाही
– काल मी पाहिलं बाळासाहेबांचा खोटा आवाज नकली आवाज
– जे सोडून जात आहेत त्यांना थांबवण्यासाठी
– हे सर्व करण्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार जपून ठेवले असते तर
– रोज सकाळी शिव्या दुपारी प्रत्यारोप होत होते
– आरोपाला कामातून उत्तर दिले
– पायाला भिंगरी लावून काम करणारा कार्यकर्ता कसा असावा तर तो रवींद्र धंगेकर यांसारखा
– तुम्ही स्वगृही आलेला आहात
– बातम्यांमध्ये मी पाहिलं काँग्रेस सोडणे याचं तुम्हाला दुःख होत आहे पण आता थोडे दिवस थांबा शिवसेनेत उशिरा आलो याचं दुःख तुम्हाला होईल
– देर आहे दुरुस्त आहे
– खुर्ची साठी आपल्याला मोह नाही
– लाखो दो तीन मला माहित आहे
– लोकसभेमध्ये तुम्हाला चार लाख मतं मिळाली ती काही कमी नाही
– तुम्हाला कधीही दुःख वाटणार नाही शिवसेनेमध्ये का आलो
– हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे
– इथे कोणी मालक नाही कोणी नोकर नाही
– तुम्हाला वाढदिवसाच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….