राधेश्याम दिंडे राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित ; हिंगोली येथे भव्य सोहळ्यात पुरस्काराने सन्मानित….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद तालुक्यातील येथील कोषटवार वार्ड नवीन पुसद रहिवाशी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे राधेश्याम उर्फ लल्ला दिंडे यांच्या कार्याची दखल घेत यशवंत संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कुऱ्हाडे यांनी ” अहिल्यादेवी त्रिशताब्दी ” जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य तर्फे आयोजित राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने हिंगोली येथे आयोजित भव्य कार्यक्रमात दि. 9 मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भव्य सत्कार करून सन्मानित करण्यात आले. राधेश्याम उर्फ लल्ला दिंडे यांच्या सामाजिक कार्याची दखल यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य यांनी घेऊन हा भव्य सोहळ्यामध्ये समाज रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. तालुक्यामध्ये गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून राधेश्याम दिंडे यांच्याकडे बघितल्या जाते, त्यांनी तालुक्यात दीनदुबळ्यांना गोरगरिबांना सढळ हाताने मदत करणे, रक्तदान शिबिर घेणे, दिव्यांग अनाथांना मदत करणे, शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा घेणे, पोलीस भरतीपूर्व स्पर्धा परीक्षा घेणे अशा विविध सामाजिक क्षेत्रात मध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल एका मोठ्या संघटनेने घेतली. हे कौतुकास्पद आहे. हिंगोली शहरातील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित भव्य सोहळ्यामध्ये त्यांना “राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या त्यांच्या सन्मानामुळे पुसद तालुक्यासह शहरांमध्ये त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहे. तर त्यांच्या हातून अशीच गोरगरिबांसाठी, दीनदुबळ्यांसाठी , गरीब शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी दिव्यांग अनाथ बांधवांसाठी त्यांच्या हातून अशीच सेवा घडो अशी अपेक्षा समाज बांधव करीत आहे हे विशेष.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….