उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तब्येत बिघडली, एम्स रुग्णालयात उपचार सुरू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अस्वस्थ वाटू लागल्यानं आणि छातीत दुखू लागल्यानं त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं असल्याची माहिती मिळाली आहे.
जगदीप धनखड यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना मध्यरात्री दोन वाजता रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या त्यांच्यावर क्रिटिकल केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. कार्डियॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर राजीव नारंग हे त्यांच्यावर उपचार करत आहेत. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. याबाबत अद्याप रुग्णालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाहीय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीप धनखड यांना मध्यरात्री रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलंय. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….