औरंगजेबची कबर हटवायची आहे पण… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “जुलमी मुघल शासक अशी ओळख असलेल्या औरंगजेबाचा मृत्यू 3 मार्च, 1707साली नगरच्या भिंगार किल्ल्यात झाला. आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची इच्छा होती.
त्यानुसार त्याचा मुलगा आझम शाह यानं खुलताबादमध्ये त्याची कबर बांधली. औरंगाबादजवळ खुलताबाद इथं औरंगजेबाची कबर आहे. औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी होत आहे. औरंगजेबच्या कबरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.
औरंगजेबची कबर हटवण्याची मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. प्रत्येकाला असच वाटतं की कबर हटवली पाहिजे. मात्र काही गोष्टी कायद्याने कराव्या लागत असल्याचं फडणवसी म्हणालेत. तसेच औरंगजेबच्या कबरीला जुन्या काँग्रेसच्या काळात एएसआयचं संरक्षण मिळालं असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय.
अबू आझमींनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. त्यांनी औरंगजेबाची कबर ठेवण्याची काय गरज असा सवाल उपस्थित करत औरंगजेबाची कबर उखडून टाका, असं विधान केलंय.
औरंगजेबाच्या कबरीवर 13 वर्षात 6.5 लाखांचा खर्च झालाय तर शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी मात्र काही हजारांचा खर्च झाल्याची माहिती हिंदू जनजागृती संघटनेचे सुनील घनवट यांनी दिली. तसेच त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं अनुदान रद्द करण्याचीही मागणी त्यांनी केलीय.
औरंगजेबाच्या कबरीबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिलीय…औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा असं वडेट्टीवारांनी म्हटलंय… मात्र औरंगजेबाच्या नावाखाली धर्मांधता पसरवणे, हिंदू-मुस्लीम वाद पसरवणं योग्य नसल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय…

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….