”देशातील रस्ते अपघाताच्या घटनांना सिव्हिल इंजिनिअर जबाबदार”, नितीन गडकरींचा दावा; कारवाईचा इशारा देत म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “भारतातील रस्ते अपघाताच्या घटनांना सिव्हिल इंजिनिअर आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा दावा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
तसेच त्यांनी अशा इजिनिअर्स आणि ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. नितीन गडकरी यांच्या या दाव्यानंतर आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.
नितीन गडकरी यांनी गुरुवारी ग्लोबल रोड इन्फ्राटेक समीट अँड एक्स्पो (GRIS) या कार्यक्रमात बोलताना यासंदर्भात भाष्य केलं. ते म्हणाले, ”दरवर्षी देशात ४ लाखाच्या वर रस्ते अपघताच्या घटना घडतात, यात लाखो लोकांचा मृत्यू होतो. यापैकी ६६ टक्के मृत्यू हे १८ ते ४५ वयोगटातील आहेत, हे देशाच्या दृष्टीने चांगलं नाही. याचा वाईट परिणाम देशाच्या जीडीपीवरही होतो आहे.”
पुढे बोलताना त्यांनी या घटनांना इंजिनिअर्स आणि ठेकेदार जबाबदार असल्याचंही म्हटलं. ”रस्ते अपघाताच्या घटनांना खरं तर सिव्हिल इंजिनिअर आणि ठेकेदार जबाबदर आहेत. मी सर्वांना दोष देत नाही. मात्र, काही लोक नक्कीच गुन्हेगार आहेत. १० वर्षांच्या अनुभवानंतर मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे. विशेषत: जे लोक डीपीआर बनवतात, ते खरे दोषी आहेत. अशा लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा विचार सरकार करते आहे”, असा इशाराही त्यांनी दिला.
रस्ते अपघातील जखमींना कॅशलेस उपचार
दरम्यान, रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना कॅशलेस उपचार देण्याची घोषणा सरकारने केली होती. या घोषणेचा पुनरउच्चारही नितीन गडकरी यांनी यावेळी केला. ”कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर वाहनांमुळे अपघात झाल्यास, जखमींना ७ दिवसांपर्यंत प्रति व्यक्तीला दीड लाख रुपयांपर्यंतचा कॅशलेस उपचार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे”, असं त्यांनी सांगितलं.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….