मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली; छत्रपती संभाजीनगरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
छत्रपती संभाजीनगर :- “मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. जरांगे पाटील यांना रात्रीपासूनच अस्वस्थ वाटत होते. आज सकाळी भेटण्यास आलेल्या कार्यकर्त्यांच्या समोरच त्यांना भोवळ आली.
त्यामुळे काही वेळापूर्वीच त्यांना अंतरवाली सराटी येथून छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश वाकडे पाटील आणि काही कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी येथे गेले असता त्यांच्यासमोर जरांगे पाटील यांना भोवळ आली. यामुळे सर्वांनी जरांगे पाटील यांना वाहनाने छत्रपती संभाजीनगर मधील खाजगी रुग्णालयात सकाळी 11 वाजता दाखल केले. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासह अन्य मागण्यासाठी अनेकदा बेमुदत उपोषण केले होते. या उपोषणाचा त्यांच्या शरीरावर परिणाम झाल्याने त्यांच्या तब्येतीत अचानक बिघाड होतो.
छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू
आज सकाळी नेहमीप्रमाणे अंतरवाली सराटी येथे त्यांना भेटण्यासाठी विविध ठिकाणचे समाज बांधव आले होते. त्यांना भेटत असतानाच जरांगे पाटील हे चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांच्या सहकार्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….