संजय राऊतांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला वाहिलेली शाल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फेकली, अन्…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “काल ठाण्यात शिवसेनेतील दोन्ही गटात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
यावेळी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत यांनी पुतळ्याला वाहिलेली शाल आणि हार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फेकून दिली. कार्यकर्त्यांनी राऊतांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
काल ठाण्यात ठाकरे गटाच्यावतीन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याआधी खासदार संजय राऊत यांनी टेंभीनाका येथील दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हार आणि शाल रस्त्यावर फेकून दिली. यावेळी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, यावेळी पोलिसांनी खासदार संजय राऊत यांना जाण्यास वाट मोकळी करुन दिली.
संजय राऊतांची टीका
ठाण्यातील राड्यानंतर खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. राऊत म्हणाले, आनंद दिघे तुमची खासगी प्रॉपर्टी आहेत का? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे कुणाची खासगी मालमत्ता नाहीत. आम्ही दिघे यांच्या पुतळ्याला हार घातल्यामुळे १०० रेडे कापून यांना आता दुग्धाभिषेक करण्याची वेळ आली आहे. पण, हे दूध कोणत्या रेड्याचं होतं, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….