शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोल्हापूर :- “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला.
कोल्हापुरतील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकरवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 11 मार्चला होणार आहे.
कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना अचानक फोन करुन प्रशांत कोरटकर या व्यक्तीनं शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसंच चुकीचा इतिहास का सांगता असं विचारताना त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केलं. या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लीप खुद्द इंद्रजीत सावंत यांनी पत्रकार परिषद घेत समोर आणली. तसंच कोरटकरवर कारवाईची मागणी केली. यासाठी त्यांनी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली.
दरम्यान, शनिवारी इंद्रजीत सावंत यांची पोलिसांनी या प्रकरणी सात तास चौकशी केली. तसंच, त्यांच्या फोनवर आलेल्या या कॉलची फॉरेन्सिक तपासणी केली. तसंच सीडीआर देखील तपासले यामध्ये हा फोन कॉल खरा असल्याचं उघड झालं, त्यामुळं या ऑडिओ क्लीपमध्ये कुठलीही छेडछाड झालेली नसून तो कोरटकरचाच आवाज असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ऑडिओ क्लीप फेकचा दावा
कोरटकरच्या आक्षेपार्ह विधानामुळं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर राज्यातील विविध भागांमध्ये या प्रशांत कोरटकरविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या. हे प्रकरण पेटल्याचं लक्षात येताच कोरटकरनं घुमजाव करत आपला हा आवाज नसल्याचा दावा केला. तसंच ही फेक ऑडिओ क्लीप असल्याचंही त्यानं म्हटल. पण अखेर त्याचा हा दावा फोल ठरला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….