भारताविरोधात घोषणाबाजी करणाऱ्याला निलेश राणेंनी शिकवला धडा, दुकानावर चालवला JCB
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मालवण :- “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर एका मुस्लिम व्यक्तीने भारताविरुद्ध घोषणाबाजी केल्याची घटना समोर आली होती. याची माहिती मिळताच शिवसेना आमदार निलेश राणे यांनी त्या व्यक्तीविरुद्ध कारवाईची मागणी केली होती.

यानंतर मालवण नगरपरिषद प्रशासनाने आरोपी व्यावसायिकाचे भंगाराच्या दुकानावर जेसीबी चालवला, आणि त्याचे दुकान पूर्णपणे उद्ध्वस्त केले. याबाबत निलेश राणे यांनी माहिती दिली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान पाकिस्तानने रोहित शर्माची विकेट घेतल्यानंतर भंगार दुकानाच्या मालकाने ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर निलेश राणे यांनी याची तक्रार मालवण नगर परिशद प्रशासनाकडे केली होती, यानंतर प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईचे काही फोटो राणे यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.
निलेश राणेंनी ट्वीटमध्ये काय म्हटलं?
निलेश राणेंनी ट्वीट करत म्हटले की, ‘मालवणात एक मुसलमान परप्रांतीय भंगार व्यवसायिक यानी काल भारत पाकिस्तान मॅच नंतर भारत विरोधी घोषणा दिल्या. कारवाई म्हणून आम्ही या परप्रांतीय हरामखोराला जिल्ह्यातून हाकलून देणारच पण त्या अगोदर तात्काळ त्याचा भंगार व्यवसाय उध्वस्त करून टाकला. मालवण नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी ताबडतोब कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार.’
भारताचा पाकिस्तानवर विजय
भारताने पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 49.4 षटकांत सर्वबाद 241 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने 42.3 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. विराट कोहलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 51 वे शतक झळकावले. 111 चेंडूत 100 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला.
या विजयासह रोहितच्या पलटणने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या 6 सामन्यांमधला टीम इंडियाचा हा तिसरा विजय आहे. टीम इंडियाचा एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्धचा हा सलग सातवा विजय आहे. मेगा मॅचमध्ये टीम इंडिया 2 मार्चला न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….