‘हा’ माजी आमदार सोडणार राजू शेट्टींची साथ ; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत करणार शिवसेनेत प्रवेश..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेत निवडणुकीवेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली. मात्र, त्यांना अपयश आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे निकटवर्तीय असलेले हातकणंगलेचे माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर (Dr. Sujit Minchekar) हे गुरुवारी (ता.२७) शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेनेचे (Shiv Sena) एकनाथ शिंदे हे बंड करत तब्बल ४० आमदार घेऊन गुवाहाटीला गेले. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हेदेखील शिंदेसेनेत जातील, असा विश्वास अनेकांना होता.
मात्र, मिणचेकर यांनी अडचणीच्या काळी उद्धव ठाकरे यांची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला व विधानसभा निवडणुकीपर्यंत शिवसेना ठाकरे गटातच राहिले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेत निवडणुकीवेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली. मात्र, त्यांना अपयश आले.
दरम्यान, निवडणुकीवेळी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केलेले डॉ. मिणचेकर आता खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….