धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले… नैतिकता आणि यांचा संबंधच नाही….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मस्साजोगचे सरपंच संतोष हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपानंतर मंत्री धनंजय मुंडे विरोधकांच्या कचाट्यात सापडले. विरोधकांकडून चहुबाजूने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
राजीनाम्याच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. तसेच अजित पवार यांना खोचक टोलाही लगावला आहे.
‘सरकारने मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात कुठलीही भूमिका घेतल्याचं दिसून येत नाही. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा की नाही, हे स्वत: धनंजय मुंडे यांनी ठरवावं. माझ्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला तेव्हा मी राजीनामा दिला होता’, असं अजित पवार म्हणालेत.
यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावला. ‘या लोकांचा आणि नैतिकतेचा काही संबंध आहे का?’ असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, ‘याआधी जेव्हा एखाद्या मंत्र्यांवर आरोप झाले तर, त्यांचा राजीनामा घेण्यात येत होते. पण आता मुद्दा असा आहे की, नैतिकता आणि या लोकांचा काही संबंध आहे का?’ असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.
तसेच मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर त्यांनी, ‘स्वाभिमान असलेल्या कोणत्याही व्यक्तीने राजीनामा दिला असता’, असं शरद पवार म्हणालेत.
मंत्री माणिकराव कोकाटे देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका आरोपाखाली त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यावर शरद पवार म्हणाले, ‘हे महाराष्ट्रासाठी चांगले लक्षण नाही. अशा आरोपांना सामोरे गेलेल्या काही नेत्यांनी याआधी नैतिकतेच्या आधारावर तात्काळ राजीनामा दिला आहे. पण या सरकारकडून नैतिकतेची अपेक्षा करणं व्यर्थ आहे’, असंही शरद पवार म्हणालेत.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….