पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी, ग्रामसभेचा ठराव मंजूर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अहिल्यानगर :- “सर्वांना सामावून घेणारा, प्रेम सद्भभावनेसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात मागील काही काळापासून धक्कादायक गोष्टी घडत असल्याचे समोर येत आहे. भटक्यांची पंढरी म्हणून राज्यभर ओळख असलेल्या मढीच्या कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत यावर्षी मुस्लीम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे.
मार्च महिन्यामध्ये ही यात्रा भरते. यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून यात्रेकडे पाहिले जाते. मात्र, या ऐक्यालाच तडा जाणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
मढीच्या कानिफनाथ महाराजांची ही यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत यात्रा सुरू असते. या यात्रेबाबत ग्रामसभा झाली. मढी यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी घालावी, अशी मागणी करणारी पत्रे विविध गावातून आल्याचे सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड यांनी सभेत सांगितले. या पत्राची दखल घेत ग्रामसभेपुढे मरकड यांनी हा विषय मांडला. पारंपरिक पद्धतीनुसार देवाला महिनाभर अगोदर तेल लागलेले असते. असा कालावधी मढीच्या ग्रामस्थांच्या दृष्टीने दुखवट्याचा असतो. या काळात ग्रामस्थ तळणे, लग्नकार्य, शेतीकामे, प्रवास असे कार्य पूर्णपणे बंद करून घरामध्ये पलंग, गादीही वापरत नाहीत. महिनाभर कौटुंबिक सर्व कामे बंद ठेवून सर्व ग्रामस्थ नाथांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून देतात.
हिंदूंच्या भावनांना ठेच…
मढी येथे येणारे व्यापारी परंपरा पाळत नाहीत. त्याशिवाय मटका, जुगार खेळले जातात. त्यामुळे हिंदूंच्या भावनांना ठेच बसल्यासारखे वातावरण झाले असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. कुंभमेळ्यात काही ठिकाणी मुस्लीम, व्यापाऱ्यांना बंदी केली. तशी मढी यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी करावी, अशी मागणी अनेकांनी केली आहे. त्यानुसार ग्रामसभेच्या ठरावात मुस्लीम व्यावसायिकांना मढी यात्रेमध्ये बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच मरकड यांनी सांगितले. ग्रामसभेतील ठरावावर आता प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….