कोकाटे यांना मंत्रिपदावरून त्वरित हटवा; न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “बनावट कागदपत्रांचा वापर करून मुख्यमंत्री कोट्याअंतर्गत देण्यात येणारी सदनिका हडपल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने गुरुवारी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी ठरवून दोन वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांना मंत्रिपदावरून त्वरित हटवावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कोकाटे निवडून आले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोकाटे यांची आमदारकीचा आता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, की शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता तरी त्यांचा राजीनामा घ्यावा. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याच्या आरोपामुळे माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. इतके उद्योगी लोक महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात असल्याने दररोज सरकारची लाज निघत आहे. आरोप होत आहे, न्यायालयाकडून शिक्षेचे आदेश निघत असतानाही, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आरोपी मंत्र्यांना स्वतः क्लीन चीट देऊन त्यांची पाठराखण करत आहेत,’ असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सरकार ही भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार करताना सर्व मर्यादा सोडल्याचे उघड झाले आहे. आता कोकाटे यांना बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या दोघांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….