पिक विमा योजनेला मुदतवाढ नाही ;अंतिम मुदत 31 जुलै
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी
खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी बँक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत विमा अर्ज स्विकारण्यात येत आहेत. बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यामुळे अंतिम मुदतीपूवी ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार नाही.
योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत वाढविणे केंद्र सरकारच्या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अशक्य आहे.त्यामुळे कोणत्याही चर्चेवर विश्वास न ठेवता नोंदणीसाठी नजीकच्या बँक अथवा आपले सरकार केंद्रामध्ये 31 जुलैपर्यंत विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा.
या संदर्भात नजीकच्या विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…