कराड, धस अन् मुंडे एकच, मी विश्वास ठेवायला नको होता; राऊतांची खंत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपा आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराड याच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने त्यांच्यावरही धसांकडून आरोप करण्यात आले होते.
ज्यामुळे राजकारणात मुंडे वि. धस अशा नव्या वादाला सुरुवात झाली असल्याचे बोलले जात होते. परंतु, या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्याने त्यांनी त्यांच्यावर केलेले आरोप खोटे होते का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा या भेटीच्या बातमीनंतर नाराजी व्यक्त केली. पण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर संताप व्यक्त करत वाल्मीक कराड, धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे एकच असल्याचे म्हटले आहे. बीडमधील काही लोक मला हे तिन्ही लोक एक असल्याचे सांगत होते, पण मी सुरेश धस यांच्याबाबत तो विश्वास ठेवला नाही, असेही यावेळी राऊतांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….