‘शेतकऱ्यांबद्दल मी तसं म्हटलोच नाही’, कृषिमंत्री कोकाटेंची सारवासारव…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- “अस्मानी संकटामुळे बळीराजा निसर्गाशी दोन हात करून कशी बशी शेती करतोय. दुसरीकडे बाजारातही भाव कोसळत असल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. अशातच नव्यानेच राज्याचे कृषीमंत्री झालेले माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याची तुलना थेट भिकाऱ्याशी केल्यामुळे खळबळ उडाली.
चोहीबाजूने टीका झाल्यानंतर कोकाटे यांनी आपल्या वक्तव्याचं खापर प्रसारमाध्यमांवरच फोडलं.
‘एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही, मात्र आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देतो’ असं वक्तव्य करून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी रोष ओढावून घेतला. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उडवली. त्यानंतर मात्र आता माणिकराव कोकाटे यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं स्पष्टीकरण दिलेलं आहे.
“विरोधक माझ्या त्या वक्तव्यावर टीका करणारच आहे, त्यांना तेवढी संधी पाहिजे, मी केलेलं वक्तव्य त्यांना तरी कळलं का? विरोधी पक्ष ते त्यांच्या पक्षाची बाजू मांडणार आहे पण तुम्ही जे मांडले ते चुकीचं मांडलं त्याच्यामुळे अशा प्रतिक्रिया येत आहे. मी असं म्हटलं की, एक रुपयांमुळे बाहेरच्या कंपन्यांचे गैरप्रकार वाढले, बाहेरच्या कंपन्यांनी त्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरले, त्यामुळे एक रुपयात विमा स्वस्त असल्याने त्या कंपन्यांनी गैरफायदा घेतला, हा गैरफायदा घेऊ नये म्हणून विम्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुनर्विचार करत आहे. त्यामध्ये अभ्यास करून धोरण ठरवू, पण प्रसारमाध्यामांनी माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवलं आणि लोक गैर अर्थ काढतात’ असं म्हणत कोकाटेंनी माध्यमांवरच खापर फोडलं.
‘मी सकाळी एक बोललो, तुम्ही काही तरी वेगळं चालवत आहे. मी बाईट द्यायचा की नाही. मी वक्तव्य काय केलं, हे तुम्ही चुकीचं दाखवलं. मुळात माझं तसं वक्तव्य नव्हतंच. मी असं काही बोललोच नाही. मुळात एक रुपया विमामध्ये गैरप्रकार वाढले. बाहेरच्या कंपन्यांनी अर्ज भरले. ४ लाख लोकांचे अर्ज बेकायदेशीर ठरले. १ रुपया विमा स्वस्त असल्यामुळे कंपन्यांनी अर्ज भरले. त्या लोकांनी गैरफायदा घेतला. त्यामुळे आम्ही पूर्नविचार करणार आहोत. पण तुम्ही चुकीचा अर्थ काढून दाखवलं. एक रुपयाच्या विमामुळे जे सीएसटी केंद्र धारक आहे त्यांना चाळीस रुपये मिळतात आणि शेतकऱ्यांना एक रुपया भरावा लागतो त्यामध्ये सीएसटी केंद्राच्या लोकांनी गोंधळ केला आहे, असंही कोकाटे म्हणाले.
माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले?
100 रुपयांमध्ये पिकविमा योजना आणण्याचा सरकारचा विचार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, कोकाटे म्हणाले की, हे बघा, पिकविमा योजना यशस्वी झाली पाहिजे. त्याचे फायदे तोटे हे सरकारच्या पाठीशी आहे. यातील गैरप्रकार थांबवण्यासाठी काही निर्णय तर घ्यावे लागतील. काय निर्णय घ्यायचे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसून घेतली. पण पिकविमा बंद होणार नाही. तसा विचार केला तर मला एक सांगा, भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही. आम्ही मात्र एक रुपयांमध्ये पिक विमा दिला. मात्र त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न लोकांनी केला. असा गैरप्रकार केला की बाकी राज्यातील लोकांनी देखील ऑनलाईन अर्ज केले. त्यातून असं वाटते की, ही पिक विमा खूपच चांगली आहे की काय, पण आम्ही जेव्हा चौकशी केली. त्यातून सत्य कळल्यानंतर आम्ही ४ लाख अर्ज नामंजूर केले होते, सरकार कुठे अडचणीत आलं नाही पण काही लोक असा अर्ज भरतात, त्यामुळे सुधारणा करणे गरजेचं आहे, असं माणिकराव कोकाटे म्हणाले होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….