राजन साळवींनंतर आता ठाकरे गटाचे आणखी दोन बडे नेते शिंदेंच्या गळाला? गोगावलेंचा मोठा गौप्यस्फोट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सध्या एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. ऑपरेशन टायगरबाबत बोलताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आणखी दोन नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले गोगावले?
‘ ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून येत्या मंगळवारी मुंबई येथे शिवसेना ठाकरे गटातील दोन मोठ्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचं गोगावले यांनी म्हटलं आहे’ पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, धाराशिव जिल्ह्यातल्या ऑपरेशन टायगरची जबाबदारी पालकमंत्री प्रताप सरनाईकांवर आहे, ते जे करामत करतील ती करतील. मात्र माझ्या संपर्कात जे ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत त्यांचा प्रवेश येत्या 16 तारखेला होणार आहे. बरेचसे लोक शिंदे साहेब आणि महायुतीच्या सरकारवर भरोसा ठेवून प्रवेश करू इच्छित आहेत, त्याचं आम्ही स्वागत करतो. असं गोगावले यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर धक्क्यावर धक्के
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला होता. अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. महायुतीचे तीन पक्ष मिळून तब्बल 232 जागा निवडून आल्या, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला. या पराभवानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते हे भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे.
राजन साळवी यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मोठा फटका बसला होता. अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. पुण्यात देखील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत हातात धनुष्यबाण घेतलं. महापालिका निवडणुकांपूर्वी हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातं आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….