परीक्षा बारावीची; हॉलतिकिटावर वेगळेच विषय, नावात बदल झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मंगळवार (ता. ११) पासून बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉलतिकिटावर वेगळेच विषय असणे, विषय व माध्यम बदल आणि नावात बदल अशी जवळपास ३ हजार ६२८ प्रकरणे बोर्डाकडे आली होती.
या सर्व प्रकरणांचा बोर्डाकडून परीक्षेपूर्वी तातडीने निपटारा करण्यात आला.
बोर्डातर्फे महिनाभरापूर्वी विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध करून दिले. या हॉलतिकिटावरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये चांगलाच गोंधळ पाहायला मिळत आहे. त्यात विद्यार्थ्यांचे विषय बदलून आल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. ज्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळाले, त्यावर कॉम्प्युटर सायन्सच्या ठिकाणी मराठी, भूगोल, जीवशास्त्र या विषयांच्या जागी गणित आणि मराठी असे विषय आले. अनेक विद्यार्थ्यांच्या माध्यमांमध्येही बदल झाला. विभागातील हजारो विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटावरील नावात बदल झाल्याचे दिसून आले. याबाबत बोर्डाकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर यामध्ये दुरुस्त्या करून विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने दुरुस्तीचे हॉलतिकीट देण्यात आले.
सर्वाधिक दुरुस्त्या असलेली कनिष्ठ महाविद्यालये
साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय, येलदरी, ता. जिंतूर : ५९ दुरुस्त्या
सेंट मेरी कनिष्ठ महाविद्यालय, वाहेगाव, ता. गंगापूर : ६२ दुरुस्त्या
माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ विद्यालय, टाकरन : ५९ दुरुस्त्या
साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय, अकोला (ता. बदनापूर, जि. जालना) : ४० दुरुस्त्या
कन्या कनिष्ठ महाविद्यालय, बदनापूर (जि. जालना) : ४० दुरुस्त्या
दुरुस्त्यांचे स्वरूप
माध्यम बदल : १,६५०
विषय बदल : ६२०
नावात बदल : १,२३८
बोर्डाकडून विद्यार्थ्यांच्या परीक्षा फॉर्ममध्ये अचूक माहिती भरण्याचे आदेश शाळा, महाविद्यालयांना देण्यात येतात. माहिती भरल्यानंतरही प्री-लिस्ट शाळांना पाठवून दुरुस्त्या करण्याचे आवाहन केले जाते. मात्र, याकडे शाळा, कॉलेज दुर्लक्ष करतात. ज्या शाळा, महाविद्यालयांच्या जास्त दुरुस्त्या आहेत, त्यांना बोर्डाकडून नोटीस पाठविली जाणार आहे.
– डॉ. वैशाली जामदार, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….