स्लॅब नुसार वीजदर आकारा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे वीज कंपन्यांना निर्देश
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यातील वीज ग्राहकांना कंपन्यांनी जून महिन्यात भरमसाठ वीज बिले पाठवल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. राजकीय पक्षांकडूनही विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे अखेर मंगळवारी (ता. २८) मंत्रालयात उर्जा मंत्री नितीन राऊत आणि वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. यात मंत्रिमडळातील मंत्र्यांनीदेखील वाढीव वीज बिलाबाबत नागरिकांची गाऱ्हाणी मांडली. त्याची दखल घेत ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करता वीज युनीटच्या एकूण वापरानुसार म्हणजेच स्लॅबनुसार वीज दर आकारण्याचे निर्देश उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्याना दिले आहेत. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवर दिली.लॉकडाऊनच्या कालावधीत वीज कंपन्यांनी ग्राहकांना सरासरी वीज बिले पाठवली. जून महिन्याचे भरमसाठ बील पाहून ग्राहकांचे डोळे पांढरे झाले. लॉकडाऊनमुळे अपुरा पगार, नोकरी गमवावी लागल्याने अनेकांना हा मोठा धक्काच होता. वाढीव वीज बिलाविरोधात राज्यात नागरिक आंदोलने करत आहेत. यामध्ये विविध राजकीय पक्षांनीही सहभाग घेतला आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे राज्यातील आमदारांनीही राज्य सरकारकडे नागरिकांच्या तक्रारी मांडल्या आहेत.

मंगळवारी मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहनमंत्री अनिल परब, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मंत्री आणि वीज कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी वीज कंपन्यांनी वीज बिलाबाबत सादरीकरण केले. या बैठकीत ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करता स्लॅबनुसार बिल आकारण्याचे निर्देश उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्याना दिले. बुधवारी (ता.२९) वीज नियामक आयोगाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत जनतेला दिलासा देण्याचा निर्णय होऊ शकेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..