दिल्लीत आपचे दिग्गज नेते पराभूत, पक्षाच्या विजेत्या उमेदवारांची संपूर्ण यादी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा पराभव झाला आहे. दिल्लीत तिहेरी निवडणूक झाली होती. मात्र, निकाल दुहेरी लागलाआहे.
काँग्रेसचा सुपडासाफ झाला असून आपला २३ तर भाजपाला ४७ जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत फारसा फरक नसला तरीही दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागांमध्ये दुप्पटीचा फरक आहे. तसंच, आपचे मुख्य नेते असलेले अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, मुख्यमंत्री आतिशी आणि सत्येंद्र जैन यांचाही पराभव झाला आहे. त्यामुळे दिल्लीत आपचं अस्तित्वच आता धोक्यात आलं आहे. दरम्यान, आपच्या संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी पाहुयात.
२०१५ पासून दिल्लीत आपची सत्ता होती. अरविंद केजरीवाल गेल्या तीन टर्मपासून मुख्यमंत्री होते. मात्र, यंदा निवडणुकीच्या काही महिने आधी मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आरोप झाल्याने तुरुंगात जावं लागलं. परिणामी त्यांनी मुख्यमंत्री पद सोडून आतिशी यांना मुख्यमंत्री पदी विराजमान केलं. आता त्यांना बहुमत न मिळाल्याने ते सत्तेबाहेर गेले आहेत.
दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी मतप्रक्रिया पार पडली. दिल्लीत १ कोटी ५६ लाख मतदार असून १३ हजार ७६६ मतदार केंद्रात ही मतप्रक्रिया पार पडली. येथे ७० जागांसाठी ६९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….