दहावीचा निकाल : राज्यात एकूण ९५.३० टक्के निकाल; यंदाही कोकण विभाग पुढे
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी
राज्यातील नऊ विभागीय मंडळातंर्गत घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.७७ टक्के तर औरंगाबाद विभागाचा निकाल ९२ टक्के लागला आहे. मुंबईचा निकाल ९६.७२ टक्के लागला आहे. तर नाशिकचा निकाल ९३.७३ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्याच्या निकालात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलींचा निकाल ९६.११ टक्के तर मुलांचा निकाल ९३.९० टक्के लागला आहे. यंदा परीक्षेला राज्यभरातून १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थी बसले होते. त्यातील १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कुठे आणि कसा पहाल निकाल –
– निकाल पाहण्यासाठी वर दिलेल्या वेबसाईटला विझिट करा.
– तिथे “Maharashtra SSC Result 2020” या हायपरलिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.
– त्यानंतर निकाल आपल्या स्क्रिनवर दिसेल.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..