महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार: पैलवान चंद्रहार पाटील यांनी घेतला मोठा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “यंदाची २०२५ महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहमदनगरमध्ये मोठ्या उत्साहात चालू असताना शेवटच्या दिवशी या स्पर्धेला गालबोट लागले. गादी विभागातील अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर पैलवान शिवराज राक्षेने मोठा राडा घातला होता.
पंचाचा निर्णय अमान्य करत शिवराज राक्षेने आखाड्यातच पंचाची कॉलर पकडत त्यांना लाथ मारली. या प्रकरणानंतर कुस्ती परिषदेकडून शिवराज राक्षेवर तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. या राड्याचे राज्यभरात पडसाद उमटलेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गोंधळावरून महाराष्ट्राचा डबल केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठा निर्णय घेतलाय.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील राड्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी आता आपल्याला मिळालेल्या दोन्ही चांदीच्या गदा परत देण्याचा निर्णय घेतला आहे. जे यावेळी शिवराजसोबत घडले ते माझ्यासोबत देखील घडले आहे. त्यामुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले. जर माझ्या पराभवाच्या गोष्टी मान्य केल्या तर, त्याचं मला समाधान वाटेल, तसं होणार नसेल तर येत्या दोन दिवसात मला मिळालेल्या चांदीच्या गदा कुस्तीगीर परिषदेला परत करणार असल्याचं पैलवान चंद्रहार पाटील यांनी जाहीर केले.
‘त्या’ पंचाला लाथ नाही गोळ्या घाला
शिवराज राक्षेने त्या पंचाला लाथ नाही तर गोळ्या घातल्या पाहिजे होत्या, असे वादग्रस्त विधान ठाकरे सेनेचे नेते व डबल महाराष्ट्र केसरी पै चंद्रहार पाटील यांनी केले. तर शिवराजच्या कुस्तीत फिक्सिंग झाली असून त्या पंचावर देखील कुस्ती संघांनी कारवाई करावी, अशी मागणी शिवराज राक्षेच्या कुटुंबियानी केली आहे.
अहमदनगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या सामन्यात पैलवान पृथ्वीराजचा विजय झाला. यावर चंद्रहार पाटील म्हणाले की, पहिल्यांदा तर मी पृथ्वीराजचे अभिनंदन करतो. त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही. पंचाचा निर्णय वादग्रस्त आहे. त्यामुळे शिवराजने लाथ मारून चूक केली. खरं तर त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या. मी पण २००९ साली महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळत असताना या निर्णायाला बळी पडलो होतो. त्यावेळी मी आत्महत्या करणार होतो. पंचाच्या एका निर्णयामुळे खेळाडूचे करिअर अडचणीत येते. हे मी अनुभवले आहे. त्यामुळे मी माझ्या मताविषयी ठाम आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….