उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र, घेतला मोठा निर्णय…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी आहेत. राज्यात पालकमंत्रिपदावरून महायुतीत धुसफूस सुरू आहे.
शिवसेनेच्या मंत्र्यांनी उघड नाराजीही व्यक्त केलीय. तर एकनाथ शिंदे यांनीही पालकमंत्रिपदाची अपेक्षा असण्यात गैर काही नसल्याचं म्हटलं होतं. यातच ते थेट गावी गेल्यानं पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र लिहिलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिलं आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं पत्रात म्हटलंय. पत्रात म्हटलं की, माझ्या नेतृत्वाखाली शिवसेना हा पक्ष हिंदुत्वाची विचारधारा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवणारा आहे. या वारशाचाच मान ठेवून आम्ही रालोआचे सदस्य आहोत. रालोआचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय.
शिवसेना पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय. दिल्लीतील शिवसेनेच्या नेत्यांना दिल्लीतल्या भाजपसोबत समन्वय साधून निवडणूक प्रचारात सक्रीय होण्याचे आदेश दिल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पत्रात म्हटलंय.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदेंच्या नाराजीवर जोरदार टीका केलीय. दानवे म्हणाले, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून वाद सुरू झाले आहेत. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. पण, राजी असो की नाराजी. आता ते काहीही करू शकणार नाहीत. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती दिली.
भाजपकडे शिंदेंचे रेकॉर्ड
मागील अडीच वर्षांत एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मोठी अनागोंदी झाली आहे, ती भाजपने रेकॉर्ड करून ठेवली असेल. त्यामुळे ते आता शिंदे यांना कुठेही हलू देणार नाहीत, असे दानवे म्हणाले. मंत्री उदय सामंत यांच्याकडे शिवसेनेचे वीस आमदार आहेत, असे सांगितले जाते. त्यावर दानवे यांनी, भाजपने ठरवले, तर शिंदेंचे सर्वच्या सर्व ५७ आमदार भाजपमध्ये दाखल होतील, असा दावा दानवे यांनी केला.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….