तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? पाहा 34 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला रवाना होण्याआधी मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेत असला पालकमंत्रिपदाचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली.
मंत्रीमंडळातील 42 मंत्र्यांपैकी 34 जणांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडली आहे. विशेष म्हणजे मागील काही काळापासून बीडमधील प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या धनंजय मुंडेंना पालकमंत्र्यांच्या यादीत स्थान मिळालेलं नाही. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय दादा भुसे आणि भरत गोगावले यांनाही डावलण्यात आलं आहे. रायगड, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजी नगर यासारख्या ठिकाणी पालकमंत्रिपद नेमकं कोणाला मिळत याबद्दल उत्सुकता होती. अखेर यावर शनिवारी रात्री उशीरा पडदा पडला.
तीन प्रमुख नेत्यांकडे कोणते जिल्हे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रिपद स्वीकारलं असून बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री झाले आहेत. याशिवाय शिंदेंकडे मुंबई शहरचंही पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. शिंदेंप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवारांकडेही दोन जिल्ह्यांची पालकमंत्रिपदं सोपवण्यात आली असून यामध्ये पुणे आणि सध्या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या बीडचा समावेश आहे.
जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे –
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
ठाणे – एकनाथ शिंदे
मुंबई शहर – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे-पाटील
वाशिम – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
नाशिक – गिरीश महाजन
पालघर – गणेश नाईक
जळगाव – गुलाबराव पाटील
यवतमाळ – संजय राठोड
मुंबई उपनगर – ॲड. आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (सह-पालकमंत्री)
रत्नागिरी – उदय सामंत
धुळे – जयकुमार रावल
जालना – पंकजा मुंडे
नांदेड – अतुल सावे
चंद्रपूर – अशोक उईके
सातारा – शंभूराज देसाई
रायगड – आदिती तटकरे
लातूर – शिवेंद्रसिंह भोसले
नंदुरबार – माणिकराव कोकाटे
सोलापूर – जयकुमार गोरे
हिंगोली – नरहरी झिरवाळ
भंडारा – संजय सावकारे
छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
धाराशिव – प्रताप सरनाईक
बुलढाणा – मकरंद जाधव (पाटील)
सिंधुदुर्ग – नितेश राणे
अकोला – आकाश फुंडकर
गोंदिया – बाबासाहेब पाटील
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ (सह-पालकमंत्री)
गडचिरोली – ॲड. आशिष जयस्वाल (सह-पालकमंत्री)
वर्धा – डॉ. पंकज भोयर
परभणी – मेघना बोर्डीकर

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….