शाळकरी वाहने मुलांसाठी धोकादायक…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “नियमबाह्य शाळकरी वाहने मुलांसाठी धोकादायक असल्याने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ माहिती अधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्रकुमार वर्मा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शेकडो स्कूल बसेस, ओमनी व्हॅन्स व रिक्षा शाळकरी मुलांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येतात, मात्र यापैकी अनेक गाड्या नियमांना फाटा देत आहेत. सध्या अनेक बसेस व वाहने फिटनेस सर्टिफिकेट व इन्शुरन्स शिवाय रस्त्यावर धावत आहेत. काही वाहनांचे इन्शुरन्सही कालबाह्य झाले आहेत. परमिट एका शाळेसाठी असताना गाड्या इतर शाळांसाठी वापरण्यात येतात. याशिवाय, स्पीड लॉक तोडून गाड्या ७०-८० च्या वेगाने चालवल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. शिष्टमंडळात संघटनेचे प्रवीण मेहर, भविश नागपुरे, सचिन हटवार, अमित खैरकर, अतुल गणवीर, मिथुन बोरकर आदींचा समावेश होता.
अशा आहेत मागण्या
शाळांनी परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक असले तरी, अनेक शाळा या बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आहे. तात्काळ तपासणी व कडक कारवाई करण्यात यावी. तसेच सर्व शाळांनी परिवहन समिती स्थापन करून आरटीओ कार्यालयात अहवाल सादर करावा.
मुलांच्या सुरक्षेला मोठा धोका
ओमनी व्हॅन्स व रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांची वाहतूक केली जात आहे, ज्यामुळे मुलांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होत आहे. तसेच, काही वाहनांमध्ये मुलांना चक्क सीएनजी टाकीवर बसवले जात आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….