जन्म-मृत्यूचा दाखला १ ते २१ दिवसांत मिळणार; नोंद नसेल तर ‘हा’ अर्ज करा, विवाह नोंदणीची प्रक्रिया काय?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “खासगी, सरकारी दवाखान्यात जन्म किंवा मृत्यू झाल्यास त्यांच्याकडून संबंधिताच्या नोंदीसाठी अर्ज महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडे ऑनलाइन पाठविला जातो. कागदपत्रांची पडताळणी करून २१ दिवसांत संबंधितांना दाखला दिला जात आहे.
पण, कागदपत्रे परिपूर्ण असतील आणि समोरच्याला खूपच गरज असल्यास त्यांना एका दिवसात देखील दाखला दिला जातो. दरम्यान, जन्म दाखला देताना नवजात शिशूचे नाव एका वर्षात नोंदविण्याची मुभा आहे. त्यावेळी प्रमाणपत्रावर नाव टाकून जन्मदाखला दिला जातो.
ज्या व्यक्तीच्या जन्म किंवा मृत्यूची नोंद किंवा कागदपत्रे महापालिकेकडे उपलब्ध नाहीत, अशांना १३/३ अंतर्गत संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे अर्ज करावा लागतो. तत्पूर्वी, महापालिकेकडून किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून १०-अ (रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचा दाखला) व १०-ब (सीआरएस पोर्टलवर नोंद नसल्याचे प्रमाणपत्र) जोडून १३-३ साठी अर्ज करावा लागतो.
तहसीलदार त्यांच्या यंत्रणेमार्फत अन्य कागदपत्रांवरून त्या व्यक्तीचा जन्म-मृत्यू कधी झाला हे निश्चित करतात. त्यानंतर संबंधितांना तहसील कार्यालयाकडून दाखला देण्याचे आदेश दिले जातात. त्या आदेशानुसार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून जन्म किंवा मृत्यूचा दाखला वितरित केला जातो.
सध्या महापालिकेकडे १९२७ पासूनचे रेकॉर्ड आहे, पण समोरील व्यक्तीने महापालिकेकडे किंवा ऑनलाइन पोर्टलवर जन्म-मृत्यूची नोंदच केली नसल्यास त्यांना १३-३ अंतर्गत तहसीलदारांकडे अर्ज करावा लागतो.
विवाह नोंदणीस विलंब झाल्यास ७०० रुपये दंड
विवाहानंतर ९० दिवसांत नोंदणी करणे आवश्यक असून त्यासाठी अवघे ६५ रुपयांचे शुल्क आहे. पण, त्याहून अधिक विलंब झाल्यास संबंधितांना ७६५ रुपये भरावे लागतात. विवाह नोंदणीसाठी दोघांचे आधार, पॅनकार्ड, वयाचा, राहण्याचा, ओळखीचा पुरावा आणि तीन साक्षीदार लागतात.
याशिवाय ज्या पुरोहितांनी विवाह लावला, त्यांचे आधारकार्ड, फोटो व अर्जावर स्वाक्षरी लागते. ऑनलाइन अर्ज केल्यावर संबंधितांना महापालिकेच्या नोंदणी विभागाकडून एक दिवस ठरवून दिला जातो. त्यावेळी पतिपत्नी व तीन साक्षीदार त्या ठिकाणी जातात आणि पडताळणी झाल्यावर २१ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाते.
घरी मृत्यू झालेल्यांनाही मिळणार प्रमाणपत्र
घरी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र देताना त्या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे त्यांना मृत्यू प्रमाणपत्र देताना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता शहरातील प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून घरी मृत्यू झालेल्यांच्या घरी जाऊन त्या व्यक्तीच्या मृत्यूची कारणे शोधून त्यांचा अहवाल तयार केला जाईल आणि त्याद्वारे आता घरी मृत्यू झालेल्या व्यक्तीचाही दाखला देणे सोयीचे होणार आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….