“पुसद शहरात किती लोकांचे जीव गेल्यावर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश मंत्री महोदय प्रशासनाला देणार…?” ; या कडे लागले जनतेचे लक्ष…?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “अपघाताची मालिका पुसद शहरात सुरूच आहे. पुसद शहरात फु.ना. ते बा.ना. मुख्य रस्त्यावर तसेच शहरातील संपूर्ण चौकात मोठ्या प्रमाणा मध्ये पुसद शहरात दिवसेन दिवस अतिक्रमनाचे जाळे पसरत चालले आहे. या कडे संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी तथा नवनिर्वाचित राज्य मंत्री इंद्रनील नाईक या कडे मतांच्या राजकारणासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे अपघाताची मालिका सुरूच आहे , या मुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक अपघात घडले आहे या अपघातामध्ये अनेकांना आपला अनमोल जीव गमवावा लागला अश्या घटने मुळे जनतेश संताप निर्माण झाले असून आता किती लोकांचे जीव गेल्यावर नवनिर्वाचित मंत्री इंद्रनील नाईक संबंधित प्रशासनाला रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश पारीत करणार..? या कडे जनतेचे लक्ष लागले आहे.
आज रोजी पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका वयोवृद्ध पुरुषांच्या अपघात घडला या अपघातात त्या पुरुषाला आपलं जीव गमवावा लागला.
त्या मुळे संबंधित नप व सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करतांना कायदेच्या चौकटी राहून कोणत्या ही राजकीय दबावाला न घाबरता रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही जलद गतीने करावी अशी मागणी जोर धरत आहे. हे विशेष….