पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा बंद, डल्लेवालांची प्रकृती नाजूक; बाजारपेठा कडेकोट बंद, वाहतुकीवर परिणाम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंदीगड :- “पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी किमान हमी भावासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदमुळे राज्यात जनजीवन विस्कळीत झाले. यादरम्यान, बहुतांश प्रमुख मार्गांवर वाहतुकीवर परिणाम झाला, तर बाजारपेठा कडेकोट बंद होत्या.।
सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत या बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदच्या काळात शेतकऱ्यांनी जालंधर, पतियाळा, अमृतसर, फिरोजपूर अशा विविध शहरांमध्ये रस्त्यांवर धरणे धरून आंदोलन केले. दरम्यान, उपोषणकर्ते शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांच्या उपोषणाच्या ३५व्या दिवशी प्रकृती खालावली आहे.
शेतकऱ्यांनी रेल्वे मार्ग अडवले
– शेतकऱ्यांनी अनेक रेल्वेमार्गावरच ठिय्या धरल्याने सकाळपासून चार वाजेपर्यंत अनेक रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या.
– फिरोजपूर, जालंधरसह इतर शहरांत रेल्वे स्टेशनवर हजारो प्रवासी अडकून पडले.
– निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्थानिक लोकांनी खाद्यपदार्थांची व्यवस्था केली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….