मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस्थळाच्या मुद्यावरून प्रणव मुखर्जींच्या लेकीची नाराजी; म्हणाल्या, ”बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने…”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधानानंतर आता त्यांचं स्मृतीस्थळ उभारावं, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
या मागणीनंतर केंद्र सरकारनेही या स्मृतिस्थळासाठी जागा देण्याचं मान्य केलं आहे. मात्र, मागणीवर माजी राष्ट्रपती तथा दिवंगत नेते प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिठा मुखर्जी यांनी संताप व्यक्त केला आहे.
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. माझ्या बाबांचं निधन झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारी समितीने साधी शोकसभाही आयोजित केली नव्हती, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यासंदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना विचारलं असता राष्ट्रपतींसाठी अशाप्रकारे शोकसभा आयोजित केली जात नाही, असं उत्तर त्या नेत्याने दिल्याचही त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना, काँग्रेसच्या नेत्याने दिलेलं उत्तर चुकीचं होतं. बाबांच्या डायरीतून मला कळले की, माजी राष्ट्रपती केआर नारायणन यांचे निधन झाल्यानंतर पक्षाने कार्यकारी समितीची बैठक बोलवली होती. त्याचा ड्राफ्टही माझ्या बाबांनीच लिहिला होता, असंही त्यांनी सांगितलं. अशातच आता शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या टिकेनंतर राजकीय वर्तुळाता विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.
दरम्यान, शुक्रवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र जागा द्यावी, तसेच त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडून ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गृहमंत्रालयाकडून याबाबतचं प्रसिद्धीपत्रक प्रसिध्द करण्यात आलं आहे. मनमोहन सिंग यांच्या यांच्यावरील अंत्यसंस्कारानंतर विश्वस्त मंडळ स्थापन करुन सिंग यांचं स्मृतीस्थळ उभारण्यात येईल असं गृहमंत्रालयाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….