निवडणुकीनंतर ठाकरेंना धक्का? पराभवामुळे आणखी एक नेता साथ सोडण्याची शक्यता…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला. सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. तर, दुसरीकडे विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. निवडणूक निकालानंतर राजकीय समीकरणातही बदल झाले आहेत.
त्यामुळे आता महाविकास आघाडीतून आऊटगोईंग सुरू होण्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील काही नेते यु-टर्न घेण्याच्या तयारीत आहेत.
ठाकरेंचा नेता साथ सोडणार?
विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला अवघ्या 20 जागांवर विजय मिळाला. तर, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादीला 10 जागांवर विजय मिळाला. शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील ठाकरे गटाचे नेते के पी पाटील यांची पुन्हा कोलांटी उडी घेणार असल्याचे म्हटले जात आहे. माजी आमदार के पी पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांचा के पी पाटील यांच्याकडून घरी येऊन सत्कार करण्यात आला.
सध्या शिवसेना ठाकरे गटात असलेले के पी पाटील यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विद्यमान आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी के पी पाटील यांचा पराभव केला. निवडणुकी आधी महाविकास आघाडीत गेलेले केपी पाटील पुन्हा महायुतीकडे येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
के पी पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. के पी पाटील यांनी 2009 मध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर 2014, 2019 आणि 2024 मध्ये पराभव स्वीकारवा लागला. सलग तीन वेळेस आबिटकर यांनी त्यांचा पराभव केला. आता के पी पाटील हे पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार गटाचा नेताही साथ सोडणार?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील एक नेत शरद पवारांची साथ सोडण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. जळगाव जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार महत्त्वाचे महत्त्वाचे नेते म्हणून गुलाबराव देवकरांना ओळखलं जाते.राष्ट्रवादीतील पक्षफुटीनंतरही देवकर शरद पवारांसोबत राहिले होते. मात्र आता ते भाजपात प्रवेश करू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….