धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची अजित पवारांकडे मागणी, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रविवारी बारामती येथे देण्यात आले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या समर्थकाचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
राज्याचे सलग सहावे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांचा बारामती येथील शारदा संस्थेच्या प्रांगणात सत्कार झाला. त्यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. पवार यांना निवेदन देण्यात आले.
मराठा सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आहे. देशमुख मराठा समाजाचे असल्यानेच ही हत्या झाली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते, मंत्री धनंजड मुंडे यांना त्यांचा अडसर ठरत होता. त्यामुळे मुंडे यांनी गुंडामार्फत हत्या केली आहे. धनंजय मुंडे हे गुन्हेगारांचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. तसेच या प्रकरणाचा तपास जलदगतीने करावा, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे सुनील सस्ते, ॲड. विजय तावरे, विकास खोत आणि सचिन शिंदे या पदाधिकाऱ्यांनी केली.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….