व्हीप जारी करूनही दांडी, भाजप 20 खासदारांना पाठवणार नोटीस…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “लोकसभेत मंगळवारी एक देश एक निवडणूक विधेयक सादर करण्यात आलं. विधेयक २६९-१९८ अशा फरकाने मंजूर झालं. आता हे विधेयक जेपीसीकडे पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, एक देश एक निवडणूक विधेयकाच्या प्रस्तावावेळी भाजपने सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला होता.
तरीही काही खासदार हे विधेयक सादर करताना अनुपस्थित राहिले. आता या खसदारांना भाजप नोटीस पाठवणार आहे.
भाजपचे २० पेक्षा जास्त खासदार ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकावर मतदानावेळी संसदेत उपस्थित नव्हते. भाजकडून लोकसभा खासदारांना संसदेत उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला होता.
लोकसभेत कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी विधेयक सादर केलं. जोरदार गदारोळानंतर संसदेत हे विधेयक सादर करण्यात आलं. एक देश, एक निवडणूक यावर राजकीय पक्षांकडून वेगवेगळी भूमिका घेतली गेली. कायदा मंत्री अर्जून राम मेघवाल यांनी संसदेत हे विधेयक सादर करण्याचा प्रस्ताव मांडला.
काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या विधेयकाचा विरोध केला. यात शिवसेना, टीडीपी हे एनडीएचे घटक पक्षही या विधेयकाच्या विरोधात होते. विधेयकाच्या बाजूने २६९ तर विरोधात १९८ खासदारांनी मतदान केलं. डिविजननंतर हे विधेयक सादर करण्यात आले. त्यानंतर विधेयक जेपीसीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….