मी राजीनामा दिला तरी 15 वर्षे तुम्हाला….; खर्गेंना अमित शहांचे उत्तर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “राज्यसभेत मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. संविधानावर मी जे बोललो ते तोडून मोडून सादर केलं गेलं असं अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर काँग्रेसकडून अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली.
यावर उत्तर देताना अमित शहांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना सुनावलं. मी राजीनामा दिला तरी तुमची अडचण संपणार नाही असं अमित शहा म्हणाले.
माझ्या राजीनाम्याने काँग्रेसची अडचण कमी होणार नाही किंवा संपणार नाही. आता किमान १५ वर्षे तरी तुम्हाला वाट बघावी लागेल. काँग्रेसला किमान १५ वर्षे विरोधी बाकांवर बसायचं आहे. खर्गेंच्या आनंदासाठी मी राजीनामा दिला तरी माझ्या राजीनाम्याने खर्गेंची डाळ शिजणार नाही. १५ वर्षे तिथंच बसायचं आहे जिथं आता आहात अशा शब्दात अमित शहा यांनी उत्तर दिलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतरही काँग्रेसने कधी त्यांचा आदर केला नाही. नेहरूंच्या पुस्तकातही उल्लेख आहे की त्यांनी कधी बाबासाहेबांना योग्य जागा दिला नाही. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही. काँग्रेसच्या सरकारने स्वत:च्या नेत्यांना भारतरत्न पुरस्कार दिला. पण १९९० पर्यंत त्यांना भारत रत्न पुरस्कार देता आला नाही. काँग्रेस सत्तेत असताना बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारलं नाही. जिथं जिथं विरोधकांचे सरकार आले तिथं स्मारक उभा करण्यास सुरुवात झाली असंही अमित शहा यांनी म्हटलं.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….