विधानसभेचा पराभव भोवणार, काँग्रेसमध्ये मोठे बदल; प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘या’ पाच नावांची चर्चा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ” नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यातच काँग्रेसचे मोठे पानीपत झाले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या निवडणुकीत एकीकडे महायुतीला मोठे यश मिळाले असताना महाविकास आघाडी बॅकफूटवर आली आहे. राज्यात आघाडीला केवळ 46 जागा मिळाल्या तर फक्त 16 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून या पराभवाचे चिंतन सुरु झाले आहे. त्यातच आता काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत तर प्रदेशाध्यक्ष पदासाठी पाच जणांची नावे चर्चेत आहेत.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सध्या काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress) लवकरच प्रदेशाध्यक्ष बदलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी काँग्रेसचा विधिमंडळ गटनेता निवडीबाबत नागपूरमध्ये बैठक घेतली. यावेळी विधानसभेच्या 16 आमदार तर विधानपरिषदेच्या 7 आमदारासोबत चर्चा केली. त्यासोबतच या निवडणुकीत पराभूत झालेल्या नेतेमंडळींची भेट त्यांनी घेतली. यावेळी त्यांची मते जाणून घेतली. या बैठकीनंतर काँग्रेसचा गटनेता निवडला जाईल, असे वाटत असताना ही निवड लांबणीवर पडली आहे.
आठ दिवसापूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे. मात्र अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. त्यातच नाना पटोले (Nana Patole) यांनी विधिमंडळात गटनेता व्हायचे असल्याने प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून आता मोठी रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. त्यामुळे आता नाना पाटोलेच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.
नाना पटोले यांच्या जागी आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची चर्चा रंगली आहे. यामध्ये विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सुनील केदार या पाच जणासह इतर काही नावांची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे नाना पटोले यांची गटनेतेपदी निवड केली जाणार आहे. तर मुख्य प्रतोद पदी अमित देशमुख यांची निवड होणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.
गटनेतेपद पटोलेंकडे देण्यास विरोध?
नाना पटोले हे विधिमंडळातील गटनेतेपद मिळवण्यासाठी आग्रही आहेत. पण याला काँग्रेसच्या इतर नेत्यांकडून विरोध केला जात आहे. त्यांना विधिमंडळ गटनेता करण्याबाबतचा निर्णय हायकमांड घेणार आहे. याबाबत दिल्लीत निर्णय घेतला जाणार आहे. पटोले यांच्या नावाला वडेट्टीवार यांचा विरोध आहे. त्यामुळे आता काँग्रेस हायकमांड या निवडीबाबत निर्णय घेणार असल्याचे समजते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….