‘मगर हम चुप रहेंगे’, मंत्रीमंडळातून डावलल्यानंतरही अब्दुल सत्तार गप्पच..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीनही पक्षातील काही इच्छुक अन् माजी मंत्र्यांची वर्णी न लागल्यामुळे गरमागरमी सुरू आहे.
भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. तर याच पक्षाचे आमदार कुटे यांनीही आपण नाराज नाही मात्र कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगत भावनिक पोस्ट टाकली.
इकडे राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यामुळे त्यांनी रान पेटवले आहे. तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी मंत्री विजय शिवतारे, तानाजी सावंत हे आगपाखड करताना दिसत आहेत. या सगळ्या नाराजी नाट्यात शिवसेनेचे माजी मंत्री (Abdul Sattar) अब्दुल सत्तार मात्र शांत आहेत. डावल्ल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार होऊन तीन दिवस उलटून गेले तरी अब्दुल सत्तार यांनी कुठल्याही प्रकारची नाराजी व्यक्त केली नाही की सोशल मीडियावर पोस्ट टाकली? प्रसार माध्यमांनाही ते टाळताना दिसत आहेत.
अब्दुल सत्तार यांचे आतापर्यंतचे राजकारण आणि त्यांचा आक्रमक स्वभाव पाहता त्यांच्या या शांततेचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. अब्दुल सत्तार यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, शिवसेना आणि आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून सुरू आहे. काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना या पक्षाकडून सत्तार यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. राज्यात सरकार कोणाचेही असो त्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार कायम दिसायचे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड- सोयगाव मतदार संघातून काठावर पास झाल्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात सत्तार नाहीत. सत्तार यांचे मंत्रिपद हुकल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात समर्थकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. मात्र ती कुठल्याही परिस्थितीत व्यक्त करायची नाही, अशा सूचनाच अब्दुल सत्तार यांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांना दिल्याचे बोलले जाते.
अब्दुल सत्तार यांची उपद्रव शक्ती पाहता ते भविष्यात वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्तास मात्र सत्तार यांनी ‘हम चुप रहेंगे’ अशी भूमिका घेतल्याचे दिसते. त्यांच्या या शांत राहण्यामुळे त्यांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? याचा अंदाज त्यांच्या समर्थकांनाही येत नाहीये. सत्तार यांचीही शांतता येणाऱ्या काळातील वादळापूर्वीची शांतता ठरणार का? सत्तार आपल्याला डावलल्याचा सूड महायुती सरकारवर उगवणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….