मंत्रिमंडळाच्या यादीतील माझं नाव काल काढलं, पार्टी अशा प्रकारे राग… नाराज मुनगंटीवारांनी मनातलं सगळं सागितलं…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, यांच मुद्यावरून सुधीर मुनगंटीवार हे नाराज आहे का?
असा प्रश्न या निमित्याने विचारला जाऊ लागला आहे. तसेच नागपुरात उपस्थित असून देखील मुनगंटीवार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गैरहजर असल्याने अनेक चर्चेला उधाण आले असताना स्वत:सुधीर मुनगंटीवार यांनी यावर खुलासा केला आहे. मंत्रिमंडळाच्या यादीत माझे नाव होते, पण कालच्या यादीत वगळण्यात आल्याचा मोठा खुलासा मुनगंटीवार यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मनातील खंत यावेळी व्यक्त केली.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मंत्रिमंडळात माझं नाव आहे असे मला सांगण्यात आले परंतु काल माझे नाव नव्हते. काल सकाळपर्यंत नाव होते पण अचनाक ते नाव कमी करण्यात आले ते मला माहिती नाही. भाजप प्रदेशाकडून यादीत माझं नाव पाठवलं असं मला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे दोघांनी सांगितलं होतं. माझं नाव कटणार याची मला माहिती नव्हती.
पार्टी अशा प्रकारे राग काढते का कधी?
सुधीर मुनगंटीवारांचे ते खंदे समर्थक आहेत. पाझारे यांना उमेदवारी मिळावी यासाठी स्वत: मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले होते. शिवाय ते दिल्लीत ही गेले होते. पण त्यांच्या प्रयत्नांना काही यश आले नाही. रिकाम्या हाताने मुनगंटीवार यांना परतावे लागले होते. तीच घडामोड आपल्या विरोधात गेली का याविषयी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, पार्टी अशा प्रकारे राग काढते का कधी? मला सांगा ज्यांच्या कुंटुंबातील मुलगा दुसऱ्यांच्या चिन्हावर उभा राहतो आपण त्यांना मंत्री करू शकतो आणि मी एका निष्ठावान कार्यकर्त्यासाठी दिल्लीला गेलो म्हणून माझ्यावर राग काढतील. पक्ष असा संकुचीत विचार करत नाही.
गडकरी माझे मार्गदर्शक : मुनगंटीवार
पक्ष संकुचीत नाही मी एखाद्या उमेदवारासाठी तिकीट मागितली या कारणांनी मंत्रिपद नाकारणार नाही. बाहेरच्या पक्षाच्या उमेदवारापेक्षा पक्ष कार्यकर्त्याला उमेदवारी द्या एवढीच माझी मागणी होती. माझी गडकरी सोबत जी चर्चा झाली ती बाहेर सांगणार नाही गडकरी माझे मार्गदर्शक आहे मी अनेकदा येतो सहज चर्चा झाली. ही छोट्या भावाची मोठ्या झालेली चर्चा आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
मंत्रिपद काढलं ते मला माहिती नाही : मुनगंटीवार
मी प्रदेशाध्यक्ष होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस माझे महामंत्री होते . माझा महाराष्ट्रात परिचय आहे त्यामुळे मला मंत्री पद मिळाला नाही यामुळे लोक आपला राग व्यक्त करत आहे. माझं नाव का कापण्यात आलं याचे उत्तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे देऊ शकतात. मला थंडी मानवत नाही त्यामुळे मी दिल्लीला जात नाही. कुठल्या कारणाने माझा मंत्रिपद काढलं ते मला माहिती नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.
मला पक्ष देईल ती जबाबदारी स्विकारेल : मुनगंटीवार
मुनगंटीवार म्हणाले, लाडक्या बहिणींनी एवढे जास्त संख्येत आमदार निवडून आणले . 196 आमदारांपैकी मी आहे पक्षाने मला कुठली जबाबदारी दिली तर मी ती स्वीकारेल मी आमदार आहे त्यामुळे माझ्यावर जबाबदारी आहे. मंत्री असतो तर जास्त वेगाने काम केलं असतं आमदार आहे तर कमी वेगाने काम होईल.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..